एकट्या ह्या रात्रीत
चंद्र एकटा पडला आहे….
अमावस्येला पुन्हा विरह
चांदण्यांना घडला आहे…..
इथेच ठेवला होता गुलाब
तु विसरून निघुन गेलीस….
शोध मला तु तिचे सखे
हृदयाचा तुकडा पडला आहे……
राखेत माझ्या प्रेताच्या….
अस्थी हरवल्या आहे….
उकरू नका चितेला…
तिचा सुगंध दडला आहे….
पिंजरा माझ्या हृदयाचा
सजवून ठेवला आहे….
शोभेचाच तो पिंजरा फक्त
प्रेम पक्षी उडाला आहे….
प्रणव लिहितोय
