मुळात माणुस जसा जसा प्रगती करतोय तसतसा तो स्वतःला मर्यादा टाकुन घेतोय …….
ज्यांची गरज कधीच नसते ………
पण तरीही माणसाला ह्या मर्यादा सोडुन कधी तरी मोकळेपणे जगावेसे वाटतेच आणि त्याने ते तसे जगलेच पाहिजे . शेवटी तुम्ही आयुष्यात कितीही मोठे perfectionist व्हा पण वेडेपणा केल्या शिवाय जिवन जगण्याची मजा येणार नाही……..
आमचंही तसच काहीसे होते. इंजिनिरिंग नावाच्या एका मोठ्या यज्ञात आम्ही जप करत होते. व नेहमीचा तोच तोच पणा आल्याने थोडे मोकळेपणे वावरावेसे वाटत होते पण संधी काही मिळत नव्हती. अखेर ती संधी मिळाली ……
थर्ड इअर ला मनमाड ला visit होती आणि आम्ही सगळे अवलिया गाडीत बसलो होतो. ४० आसनी आयशर बस हाच काय तो आमचा मोकळे पणा……
मग हळू हळू गाणे सुरू झाले. पोरांमधला अल्ताफ जागा झाला आणि बस दर्द उफळुन बाहेर पडायला लागला . अल्ताफ सोबत किशोर कुमार,कुमार सानू ते मुकेश पर्यंत सगळ्यांनी गायलेले दर्द भरे गाणे पोर असा काही घसा फोडुन म्हणायचे कि त्या प्रेमाच्या दुष्काळात राडणारा खच्ची आशिकसुद्धा त्याच्या प्रेयसीला विसरून तल्लीन होऊन जाईल. मग हाच के तो आमचा शिरस्ता बनला . नेहमी जेव्हा कुठे visit जायची आमची ठेवणीतली गाणे बाहेर पडायचे आणि कल्ला चालु व्हायचा ……
“मेरे दुष्मन है जमाने के गम…..
बाद पिने के हो जायेंगे कम….”
एखादा दारुडा जेवढा हे गाणं तन्मयतेने म्हणत नसेल तेवढं प्रेमाने हावभाव करीत आमची गँग खच्चीपणे हे गाणे म्हणायचे आणि खोट्या नशेत बेफान व्हायचे……
जानेवारी पासुन डिसेंबर पर्यंत कोणालाच माहीत नसायचे एकदोन अल्ताफ चे फॅन ते पुर्ण म्हणायचे आणि आम्ही शेवटी ” वो साल दुसरा था ….ये साल दुसरा है” म्हणायची वाट बघायचो ….
इतके सगळी नवीन नवीन गाणे पौरांकडून ऐकायला मिळायचे की नंतर ते घरी जाऊन youtube वर शोधले तरी सापडायचे नाही…..
ह्या अठवणींच्या घोळक्यात जेवढे महत्वाचे हे मित्र आहेत तेवढेच महत्वाचे जगजीत सिंग,पंकज उदास,अल्ताफ राजा आणि त्यांचे बरेच गाणे आणि गझला आहेत…….
सातारा ला जाताना काहीसे वेगळे घडले होते. गाणे म्हणुन पोर थकले होते पण अचानक ” चला हवा येऊ द्या मधली” “बाप की अदालत चालू झाली” एका एका पोराला फैलावर घेऊन गाडी सर लोकांवर झाली. आणि मनात असलेला व्यवस्थेने भरडलेला आमच्या भावनांच्या ज्वलामुखीचा विस्फोट झाला आणि दिपिका पादुकोणच्या धरती वर सबमिशन विरोधात “एक drawing sheet कि किंमत तुम क्या जानो सर” हा बहुचर्चित डायलॉग बाहेर पडला. नंतर साताराची visit अजरामर करणारा कधीच ना विसरू शकणारा किर्तनाचा अध्याय घडला……..
प्रणव लिहितोय….
