दोस्त=मित्र=सखा=सुख

१ महिना झाला असेल पण त्या येड्या गाबळ्यांची भेट झालेली नाही. अस म्हणतात माणसाला एखाद्या व्यक्तीची किंमत फक्त त्याच्या गैरहजेरीतच कळते…….
तसंच मित्रांचे ही आहे. आपल्याकडे नसलेल्या गोष्टीचे अप्रूप मनाला असल्याने नेहमी नसलेल्या गोष्टींबद्दलच लिहिले गेले. आज महिनाभर मित्र विरह लाभल्या नंतर कळते की तो आपल्या जवळ असतो तो तो किती महत्वाचा असते .अश्याच काही अवलीयांबद्दल लिहावेसे वाटले म्हणुन हा प्रपंच…….

मी नक्की गेल्या जन्मात खुप पुण्य केले असेल कि ज्यामुळे ह्या जन्मात मला पदोपदी महापाप करणारे मित्र लाभलेत. मुळात देवाने मित्र नावाची संकल्पनाच जर बनवली नसती तर हे आयुष्य किती निरस झाले असते हा विचार मनाला चटका लावुन जातो………
खरंच मित्र…….जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती…….आता हे वाचुन सुद्धा हसणारे खुप असतील.
पण ह्या २५ वर्षांच्या आयुष्यात खळखळून हसवणारे कोण असतील तर हेच अवलीये.
वेडे पणाची परिसीमा ओलांडुन बुचकळ्यात पडायचे आणि नंतर काही दिवसांनी त्याच वेडेपणाचे किस्से मैफिल रंगवुन रंगवुन सजवायचे………..
पण हे लोक आठवणीत जेवढी साथ देतात तेवढेच आपल्या पडत्या काळात खंबीर उभे राहतात. कदाचित ह्या दोस्त लोकांना आपण इतके गृहीत धरलेलं असते की त्या लोकांची आपल्या पडत्या काळातली साथ आपल्याला जाणवतच नाही…..
पण एक मात्र खरं……..
कोणीतरी महान व्यक्ती बोलली आहे कि जोपर्यंत माझे मित्र माझ्या सोबती आहे तोपर्यंत मला कोणीच हरवू शकत नाही…..

आज आपण आपल्या जीवन वाटेच्या सुरवातीलाच आहोत. हे वाट कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. मित्र पुन्हा कधी भेटतील की नाही माहीत नाही. पण आपसुक एखादी जुनी आठवण मनात आली की गालावर उठणारे ते स्मित हास्य ह्या मित्रांच्या अतुट मैत्रीचे नेहमी सबुत देत राहील…..

जोपर्यंत ह्या जगात मित्र असतील तो पर्यंत जगण्यात मजा आहे. म्हणुन वाटते सगळे आयुष्य कर्म पुर्ण करून झाल्या नंतर आपली विकेट सर्वात पहिली पडावी आणि मेल्या नंतर नरकातून आपल्या मित्रांनी आपल्या अंतयात्रेला घातलेला गोंधळ हसुन हसुन बघावा आणि ते बघुनच आमच्या आत्म्याला मुक्ती मिळावी….

प्रणव लिहितोय

Leave a comment