ना राहावे एकटे कोणी ना विरह यातना…
ना ओझे अपेक्षांचे ना स्वप्नांचे अवघड रस्ते….
नको ते सुख-दुःखचे रटाळ चक्र,
ना बरसाव्या विद्रुप गारा पावसात…..
ना कधी पडावे कड्याक्याचे ऊन,
फक्त वसंत बहरावा आयुष्यात आनंदाचा….
खोट्या आश्वासनांची खैरात का दिलाने पचवावी,
पावलांनी किती वेळा घाव सोसावे काट्यांचे,
आपलीच माणसे का आपल्यापासून दुर व्हावी…
डोळ्यांनी तरी किती अश्रू साठवावे बांधावर…
रखडावी ही आयुष्याची अवघड परीक्षा कायमचीच,
अथवा संपुन जावे हे सगळं जग एकाच तडाख्यात….
प्रणव लिहितोय
