२०२० साली घरीच थांबायला हवे होते….

“भारतातील lockdown १५ दिवस वाढवला …..”
ए आई हे बघ मला के सापडलं….

छोटी मनी आई ला कुतुहलाने दाखवत होती….
मनी…..
८। वर्षांची चिमकुली गोरी पान…..
टवटवीत गाल असलेली ….. गुब्बू फुग्या सारखी नाजूक एकदम……
हल्ली बाबांची जुनी कात्रण धुंडाळत होती…..
आणि तिला हे शेवटचं कात्रण सापडलं…….
शेवटचं ……
३० वर्षांपुर्वी चे……..

१४ मे २०२० सालचा तो पेपर बघुन मनीची आई सुद्धा चकित झाली…..
तिला ते सर्व 30 वर्ष जुने चित्र डोळ्यासमोर उभे राहिले……..
कसे माणुस निवांत भटकायचा…..
घराबाहेर फिरायचा……
एकदम उनाड उडणाऱ्या चिमण्यांसरख्या ………..
खरंच किती पुण्य वाण आहेत त्या चिमण्या……
मस्त खुल्या हवेत फिरतात खेळतात बागडतात…..
पडतात झडतात…..
ना कशाचे बंधन ना कसले भय…..
ना कोणत्या रोगाची भिती………
३० वर्षापूर्वी आपण पण असाच बागडायचो खेळायचो…….
निवांत……..
एकदम…….
पण २०२० साली तो कोरोना आला ……
आणि सगळे जगच बदललं……..
सरकारला वाटलं २१ दिवसात जाईल तो कोरोना……
पण नंतर पुन्हा १४ दिवस lockdown वाढलं…..
तरी संख्या कमी होत नव्हती……
सगळी कडे हाहाकार माजलेला…….
१४ दिवसांनी पुन्हा lock down वाढवला आणि……
आणि आज पर्यंत …..
आज पर्यंत म्हणजे २०५० साल पर्यंत तो तसाच आहे………
किती वर्ष झाले . ना माझ्या मनीने उद्यान बघितले आहे ना शाळा…..
फक्त घरात बसुन राहायचे ……..
बस्स…..
उपाय तरी काय …..
बाहेर सगळी कडे कोरोना आहे……
जिथे जाईल तिथे घाट ठरलेलाच……
आज ३० वर्ष होतील त्या कोरोनाच्या आगमनाला…….
विळखा इतका जबरदस्त होता की पाहिले १,२ वर्ष वाटलेलं संपून जाईल सगळे…..
पण नाही………
सगळं सगळं काही सपशेल अपयशी ठरलंय…..
गेल्या पंधरा वर्षात निवडनुकच झाली नाही……
मतदान तरी करणार कसे…..
सगळ्या देशांचे हेच हाल……
कोणीच नेता नाही….
कोणीच सरकार नाही
……..
एकटा कोरोना काय तो राज्य करतोय…….

संशोधक ही सगळे हतबल झाले आहे…….
हल्ली शाळा clg सलग 30 वर्ष बंद असल्याने नव्या पिढीत कोणी संशोधकच बनलं नाहीये……
हातावर मोजण्या इतके लोक उरलेत की जे संशोधन करू शकतात………
ते ही अखेरची घटका मोजत आहे म्हणे………
एक जण म्हणे नव्या पिढीच्या DNA मध्ये बदलावं करून त्याना ह्या कोरोना साठी लढण्यास सक्षम करू शकतो….
त्यासाठी सगळा गरोदर महिलांना टिका सुद्धा लावण्यात आला…..बघू या पुढची पिढी तरी कशी निघते…….

आमची तर खपली ह्या कोरोना मुळे…….

काय सांगता येते जसे आपण आज डायनोसॉर बद्दल शिकतो तस काही वर्षांनी त्या चिमण्या शिकतील ” माणुस नावाचा प्राणी होता……
खुप मग्रूर……
पण कोरोना मुळे सम्पला……
घरी राहिला असता तर आज वाचला असता…..”

कदाचित आपले अवशेष सापडली पुढच्या हजार वर्षांनी जमिनीत जसे डायन्सॉर चे सापडतात आज………

३० वर्ष आधी तेव्हाच लोकांनी ऐकलं असतं…….
तर आज हे दिवस बघायला मिळाल नसते……

आता मन स्वतःला खाते……
२०२० साली आपण घरीच थांबायला हवं होतं…….

प्रणव लिहितोय….

Leave a comment