आयुष्यात वसंत नाही..

जखमांनी समजला देह माझा….
तरी हा माझा अंत नाही…..
लढता लढता पडलो मी,
त्याची मला खंत नाही……
रखडून चाललेला हा गाडा,
जीवाला थोडीशी उसंत नाही….
पानगळ सगळ्या आयुष्यात,
अजुन बघितला मी वसंत नाही…..
धपापली ही छाती माझी पण,
मध्येच थांबणे मला पसंत नाही….

प्रणव लिहितोय….

Leave a comment