बंद डायरीचे निखळलेले पान-२…..

Physics मध्ये एक संकल्पना आहे frame of reference नावाची.कि ज्यात एक रेल्वे गाडीत बसलेला माणुस दुसऱ्या डब्यातल्या माणसाकडे बघतो जसा ह्याचा डब्बा हलतो पण इकडच्याला वाटते कि पलीकडचा माणुस हलतोय. आपल्याला वाटते आपली बोगी स्थिर आहे……
एक वेगळीच मजा असते रेल्वेत बसुन दुसऱ्या बोगीत बघताना…..माझही तसच काही तरी झालेले………एक अदृश्य frame of referance बनुन गेलेली की ज्यात मी माझं सभोवताल,माझ्या आजुबाजुचे लोक सर्व काही एक फ्रेम मध्ये आणि ती………
आणि ती फक्त एकटी दुसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये………

तिच्या कडे बघितलं की काहीच भान राहत नसायचे. आम्हा दोघांमध्ये वर्गातले ८० पोरं बसलेले असायचे पण माझ्या मनाचे मेमरी कार्ड असलेला डोळे नावाचा कॅमेरा फक्त तिच्या वर खिळूण राहायचा…….

हल्ली मोबाईला 2 कॅमेरे आलेत…..काहींना तर ३ …काय तर म्हणे focousing नीट होते. Depth mode मिळतो…….पण माझं ही तसच होते काहीसे….

तो डोळ्यांचा कॅमेरा इतका तिच्यावर फोकस व्हायचा की आजुबाजूचे सर्व काही blurr होऊन जायचे….
आणि हा माझा रिअल लाईफ कॅमेरा फक्त फोकसिंग नाही तर मनाच्या हार्ड डिस्क मध्ये अगदी घट्ट मेमरी स्टोअर करायचा….अशी मेमरी की जी कधीच बर्न किंवा इरेज होणार नाही अशी….एकदम पर्मनंट टाइप….

अजुनही स्वतःला मागे धुंदाळायला गेलो की मन गदगद होते.
काही जुने व्हिडीओ ह्या मनाच्या इतके खोलवर रुजले आहेत कि प्रत्येक व्हिडीओ जर PC च्या स्क्रिन वर लोड केला तर नक्की टाइम ट्रॅव्हलचा अनुभव येईल…

मला आजही आठवते शौनकचा वाढदिवस होता .आपण कदाचित थर्ड इअर ला असु कदाचित…
तेव्हा ती जाम भारी दिसत होती.राखाडी रंगाचा क्रॉप टॉप घातला होता.. त्यावर डिझायनर छिद्रे होते ते तिच्यावर खुप क्युट दिसत होते.तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा मिसळ सोडुन दुसऱ्या कोणावर तरी लक्ष concentration केलं असेल…..

फोर्थ इयर ला असताना ती सगळ्यांचा मेकअप करून देत होती. सर्वात शेवटी मी बसलेलो. घोस्ट डे होता… भुतासरखे चेहरे रंगवायचे होते सगळ्यांना….. त्यासाठी तोंडाला सगळे लोक काजल फासत होते. तुने काजळ माझ्या डोळ्यांना लावले आणि माझ्या डोळ्यांत थोडी जळजळ झाली….आणि त्यामुळे तिचा व्याकुळ झालेला चेहरा मला आजही आठवतो….
तिला माझी वाटणारी क्षणिक का असेना काळजी मला आवडली होती……म्हणुन मी अनेक वेळा डोळ्याला त्रास झाल्याचे खोटे नाटक केलेलं. कारण मला तिला पुन्हा एकदा माझ्या साठी व्याकुळ होताना बघायचे होते….

ती कधीही ग्रुप मधल्या चर्चेत जास्त भाग घेत नसायची. पण विषय कोणताही चालू असुदे पण ती शांत सर्व काही ऐकत असायची…..

बस तीच तुझी छबी मनात कायम वसली आहे……

आयुष्यभराच्या शिदोरी सारखी……

प्रणव लिहितोय……

Leave a comment