एखाद्या द्वाड पोरालाही लाजवेल असेच इंजिनारिंगला असलेलं त्यांचे वागणे आता post graduation करतानाही चालू होते.पण बदल एवढाच की आता त्यांना uniform फक्त नव्हता. बाकी मस्ती तर बालवाडीच्या मुळासारखीच .तरी सुद्धा परीक्षा नावाचे आभाळ अचानक कोसळल्याने त्या दिवशी कधी नव्हत ते त्यांचे पाय library कडे वळाले. नेहमीप्रमाणे तिथे सुद्धा गोंधळ नि वेडेपणा चालूच होता. उद्याच्या पेपरचे पुस्तक लपवुन ठेवण्यपासून तर लागणारे पुस्तक शोधण्यासाठी त्या तिघा पोरांची धडपड चालु होती. ते तिघे जर सोबत असले की सगळ्या जगाला विसरतो पण जग मात्र त्यांना नेहमी डोळ्यांपुढे आणत असते. काहींना त्यांचा वेडेपणा बघुन हसू येते तर काहींना किळस पण असो…..
त्या दिवशी मात्र भलतंच घडले.मस्तीत जगाला विसरणारा तो त्यादीवशी मात्र स्वतःला आणि त्याच्या वेडेपणाला विसरला होता.आणि त्यामागचे कारणंही तसेच होते.
त्यांच्या प्रमाणे पहिल्यांदा पुस्तक घ्यायला आलेला आणि एवढे पुस्तकं बघुन कावराबावरा झालेला एक चेहरा त्याला काही तरी विचारात होता……..
खरं तर खुप दिवसांनी ती तशी feeling मनाला जाणवत होती. त्या चेहऱ्याच्या आणि त्या आकृतीच्या मागे हजारो रंगबेरंगी पुस्तकांची रास असतांनासुद्धा त्याला सगळ्या जगाचा विसर पडला होता………
“तुझे देखा तो ये जा ना सनम……” अगदी तसच काही तरी….
त्या काळेभोर डोळ्यांत पुर्ण बुडून गेल्यासारखे वाटत होते. पंख्याच्या हवेमुळे त्या डोळ्यांच्या आड येणारे ते केस थोडा अडथळा करत होते.पण नाजुक हातांनी त्या केसांना सावरणे त्याला आणखीनच घायाळ करत होते. अगदी NATURAL भुवयांच्या मधोमध असलेल्या बारीक टिकलीचा ठसा त्या सौन्दर्याचा कळस शोभत होता. चेहऱ्याच्या ठेवणीतलेच साझेसे नाक अधिकच सुंदरता खुलवत होते. कपाळावरच्या त्या आड्या तिचा गोंधळलेलापणा अचुक दर्शवत होत्या. पण तो कवरा बावरा चेहरा अजुन सौन्दर्याच्या राशी शिंपडत होत्या. पण या विश्वात अचानक मागुन आवाज आला “management चे बुक मागे आहेत” आणि त्याचे मन भानावर आले. खरं तर हे असं सगळं पहिल्यांदा त्याच्या सोबत घडत होते असं नाही. पण त्या त्या वेड्या ४ वर्षांनंतर दुसऱ्या कोणा मुळे घडत होते याचं त्या अवखळ मुलाला जास्त अप्रुप वाटले.
दुसऱ्या दिवशीच पेपर त्याचं कधीच न येणारे टेन्शन सगळं सगळं काही तो विसरत होता. स्वतःला विसरला होता तो, म्हणुन चुंबकसारखा तिच्या आजुबाजुला फिरण्याचा आणि मनाच्या camera मध्ये तिची छबी टिपण्याचा पुरे पुर प्रयत्न करत होता.हे सगळं करताना तो पुस्तक जमा करण्याच्या खिडकी पर्यंत येऊन पोहोचला आणि ती सुद्धा तिथेच होती. तिने पुस्तक घेतले आणि libarary card तिथेच ठेऊन निघुन गेली. नंतर तो खिडकी जवळ आला.त्याला त्या कार्ड वरचा तिचा फोटो पुन्हा पुन्हा सगळं काही rewind करायला भाग पाडत होता. त्यावर तिचे नाव आणि मोबाईल नंबरसुद्धा होता.त्याले ते सहज कळु शकले असते पण त्या अवखळ पोराने तिचे ते details जाणूनबुजून दुर्लक्षित केले.
कारण तिला बघून स्वतःला विसरलेल्या त्या अवखळ पोराला पुन्हा हरायचे नव्हते………
प्रणव लिहितोय……
